STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Inspirational

3  

Rajendrakumar Shelke

Inspirational

शिव वंदना

शिव वंदना

1 min
46

फिटे पारतंत्र्याचे जाळे,

झाले गुलामीतून मुक्त,

दरी खोऱ्यातून गर्जे

हरहर महादेव फक्त.


हिंदू जागे झाले सारे 

पायवाटा रक्षणासाठी,

सूर्य जन्माला शिवनेरीवर 

प्रकाश देण्या लोकांसाठी

 एक अनोखे साम्राज्य

आले भरास भरास,

किल्ले शिवनेरीवर सजली 

भव्य आरास.

भिजला आनदाने सारा

सह्याद्रीचा दगड दगड,

अंधाऱ्या कोठडीत पहा 

पडला उजेड उजेड.


राजे उदयास आले 

भगवा फडकला आकाशी,

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न 

जिजाऊंच्या चरणा पाशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational