वेळ
वेळ
वेळ हा नसतो
कधीच कोणाला,
किंमत कळते
प्रत्येक क्षणाला.
बंधन नसते
मनाचे मनाला,
अश्रूच सांगती
वेळ माणसाला.
वेळेत करावा
प्रयत्न एकदा,
तरच होईल
तुमचा फायदा.
घड्याळाचे काटे
तेच सांगतात,
मिनिट सेकंद
वेळ पाळतात.
आपणही आता
वेळेला जपावं,
प्रत्येक क्षणाला
हृदयात ठेवावं.
