दिवाळी (हायकू काव्य.)
दिवाळी (हायकू काव्य.)
दिवाळी (हायकू काव्य.)
**********************
आली दिवाळी
प्रकाश दारोदारी
दिवा अंतरी.
चकली लाडू
दिवाळीचा फराळ
चव रसाळ
दिव्याची वात
प्रकाशाची आरास
लक्ष्मीचा वास.
प्रेमाचा रंग
नात्यांमधला दुवा
गोड पाडवा.
भाऊ बहीण
एक अतूट नाते
भाव सांगते.
सुख समृद्धी
ऐश्वर्य नांदो दारी
घे तू भरारी.
-----------------------------
राजेंद्रकुमार शेळके.
नारायणगाव, पुणे.
