काय खरे काय खोटे ....!
काय खरे काय खोटे ....!
ना मला माझे कळेना
काय खरे काय खोटे,
रोजच मी ते पहातो
गंधित फुलांचे काटे.
होतो आभास मजला
खऱ्या खोट्या चेहऱ्यांचा,
खेळ चाले सारा आता
वेड्या माझ्या भावनांचा.
वेड जीवाला लागते
माझ्या प्रिय माणसांना,
सल अंतरी बोचते
काळजाच्या वेदनांना.
देवा काय सांगू तुला
कधी कळे माणसांना,
फसतात सारे आज
खोट्या फक्त देखाव्यांना.
