Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Ashwini Bhide

Fantasy Others


3  

Ashwini Bhide

Fantasy Others


ऊन पडलं !

ऊन पडलं !

2 mins 15K 2 mins 15K

उन्हाळ्यात ‘पडून, पडून’ एकदा उन्हाचं हाड मोडलं

प्लॅस्टरने काम झालं नाही, म्हणून ढगांच्या इस्पितळात ठेवलं

ढगांना विचारलं, “Discharge कधी देणार?” तर म्हणाले, “चार महिन्यांनी”

लगोलग औषधाची यादी आणली पावसाच्या धारांनी

म्हणता म्हणता पाऊसधारा पोहोचल्या समुद्राच्या “Medicine bank”मधे

माहित नाही कसे पण उन्हावर औषधोपचार होत होते इस्पितळामधे

ढगांच्या इस्पितळात वीज नर्सचे काम करायची

रुग्णांची सेवा करता करता मधेच बाहेर डोकावायची

पण तेवढ्यात ढग गडगडले, “उन्हाची आहे serious condition”

उन्हाच्या visitorsवर घालावे लागेल बंधन

फक्त वार्‍यापावसाला परवानगी दिली उन्हाला भेटायाची

आणि इतरांना त्याची ख्यालीखुशाली कळवायची

ऊन पटकन् बरे झाले, पण Discharge घेण्याचे त्याचे विचार मात्र बदलले

विजेला, वार्‍याला, पावसाला त्याने आपल्यासोबत घेतले

आणि “उन्हाला बरे नाही” असे वार्‍याला सर्वांना सांगायला लावले

आषाढात तर पावसाने उन्हाला ICU मधेच टाकले

इस्पितळात आराम करायचे उन्हाचे मार्ग खुले झाले

पण किती खोटं बोलणार असं वार्‍यापावसाला वाटू लागलं

कारण परवानगी नसताना इंद्रधनुष्य इस्पितळात डोकावलं

म्हणूनच त्यांनी उन्हाचं ऐकणं बंद केलं

आणि श्रावणात उन्हाला ICUमधून बाहेर काढलं

हळुहळु वार्‍यापावसाने उन्हाची साथ पूर्णपणे सोडली

आणि त्याची खुशाली सर्वांना कळवली

नंतर भाद्रपदात पावसाने बिलाची यादी आणली

काय करावं काही सुचेना, इतक्यात उन्हाची इस्पितळातून रवानगीच झाली

ढगांच्या बिलाचं कर्ज होतं बरंच

पण पाण्याची वाफ देऊन ते त्याने फेडलं खरंच

पण चार महिने आराम करायची उन्हाला आता क्लुप्ती समजली होती

आणि म्हणून दरवर्षी नवीन हाड मोडून घ्यायची त्याला सवयच लागली होती

तेंव्हापासून हे ऊन दरवर्षी हाड मोडल्याचं नाटक करतं

आणि “हाड मोडलं” या नावाखाली चार महिने आराम करतं

 


Rate this content
Log in

More marathi poem from Ashwini Bhide

Similar marathi poem from Fantasy