STORYMIRROR

Ashwini Bhide

Others

2  

Ashwini Bhide

Others

अश्रुजल

अश्रुजल

1 min
2.5K


एक अश्रु हळू गळून करतो हलके हलके डोळे

ओझे वाहून नेतो थोडे जलदातील काळे

पापण्यांच्या पंखांखाली चिंतेचा भरतो मेघ

क्रसलेल्या भुवयांची दाटे ललाटावरी रेघ

फेसाळलेल्या विचार लाटा घुसळीती मन सागरा

विवंचनांचे विषारी ढग ते येती नयनी

आकार भरकटलेल्या दिशा अन् हरवलेले मन 

काळजातील काहूर हलवी काजळाचे कण

एकच वीज चमकते अन् थरथरे पापणीदल

हुंदक्यांना दाबत बरसे हलकेच अश्रुजल

                                                       

 


Rate this content
Log in