झटक झटक मरगळलेले हे मन
झटक झटक मरगळलेले हे मन
1 min
14.2K
झटक झटक मरगळलेले हे मन
पसर पसर वर आनंदी कण
घुसळ घुसळ ते विचार मंथन
तरल तरल ते क्षणभर जीवन
कसर कसर भर सर्व चुकांची
विसर विसर सावली भुताची
विझव विझव ती आग मनातील
मिसळ मिसळ क्षमाजल शीतल
निखळ निखळ खळखळून हासू
का कशास मग मन हे उदासू
