STORYMIRROR

Ashwini Bhide

Others

2  

Ashwini Bhide

Others

“राखा”डी होळी

“राखा”डी होळी

1 min
14.6K


लाल गुलाबी निळा नि हिरवा रंग किती हे छान

रंग लावुन, रंगी न्हाऊन हरपते देहभान

कुणा दिसतो का राखाडी अन् पांढराही रंग?

कायम आपण असतो आपल्या स्वतःतच दंग

एका बाजुस निखारे निवडत ते होते

दुसर्‍या बाजुस रंगांचे सडे सांडत होते

पैसे खोबरे कहितरी नक्कीच हाती लागेलं

त्याच जिवावर आजचाही मग दिवसतरी निघेलं

पाणी दिसता पडताना, तहान कशी ती आवरू?

रंग मिसळल्या ’जीवना’ला कैसे मी वापरू?

होळीचा आनंद लुटावा असे ते हात चिमुकले

रोजचे प्रश्न सोडवताना राखेने ते माखले

नजरेतून सांडत असतो आनंदाचा हव्यास

कुणी उधळल्या रंगातच न्हाण्याचा असतो ध्यास

या कोवळ्या मनालाही साजरी करायची आहे होळी

पण गोष्टीतच फक्त ऐकली त्याने पुरणाची पोळी

चिंब भिजला थंड देह हा विविध रंगांनी

असेच रंग संवेदनांचे ल्यावे जरा मनांनी

सामावावे आपल्या रंगात एक छोटेसे मन

वाटावा थोडासा आपल्या आनंदाच्या तिळाचा कण

 

 


Rate this content
Log in