Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashwini Bhide

Abstract

4.1  

Ashwini Bhide

Abstract

आईचा प्रवास

आईचा प्रवास

1 min
341


ज्येष्ठ अपत्यासंगे जन्मे एक नवी 'आई'

'आई' म्हणून नवजातच ती, नवेच सर्वकाही

आई, आजी, सासू देती आधार त्यांच्या अनुभवांचा

पण असतो सगळा प्रवास तिचाच एकटीचा

बाळा पाहून हर्शून जाते ती नवी जननी

नसते पर्वा पुढची कशाची सुख असो वा अडचणी

पण नसतो आनंद सर्वकाळ हा कळत जाते तिला

सुंदर चित्र होते लेवून हरेक भावरंगाला 

आई बाळाचे नाते त्याला अपवादही कसे

सृजनाची सुरुवात असे ती श्रेष्ठत्व तयाला असे

आई घडवते बाळाला अन् बाळ घडवते आई

स्त्री च्या व्यक्तीमत्वाला हे नवी प्रगल्भता देई

बाळाला वाढवणं हा खाचखळगे वळणाचा मार्ग

पण ही गोड जबाबदारी देते तुम्हाला सर्व पार पडायचे धैर्य

कधी वाटतं प्रेम, कधी वाटते काळजी,

पण आई नसते सांभाळायला सतत त्याचीच मर्जी

मग येतो राग, होते चिडचिड कधी,

शिस्तीचा बडगा देते आई मन कठोर करून अगदी

आई म्हणजे असतो चढता आलेख संयमाचा 

प्रेम आणि शिस्त यांच्या समातोलाचा 

कोडकौतुक त्याचे करायला पुढे तीच असते

आईची एक मिठी आणि पापा याची सर कशालाच नसते

कधी वाटत अपराधी, कधी वाटत झाले लाड फार

बाळ झोपता आत्मचिंतन करते आणण्या स्वतःतच सुधार

कसे समजवावे कसे समजून घ्यावे

बाळ चांगले घडण्या कसे स्वतःला बदलावे

चुकत सुधारत एक स्त्री आई म्हणून घडते

बाळ मोठे होता आई मैत्रीण होते

आईचा हा प्रवास चालूच राहतो तरी

कधी आधार, कधी अलिप्तता बदलणारी भूमिका जरी

एक आई घडते घडवते खरे असले जरी

तरी टाकू नये समाजाने आदर्शतेचा बोजा तिच्यावरी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract