Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashwini Bhide

Others

3.4  

Ashwini Bhide

Others

मुलीचा जन्म हा एक शाप की वरदान?

मुलीचा जन्म हा एक शाप की वरदान?

2 mins
8.1K


मुलीचा जन्म हा एक शाप की वरदान?

निर्माण होतो हा प्रश्न जेंव्हा देव निर्मितो गर्भात प्राण.

गर्भ वाढवताना आई म्हणते मुलगाच मला व्हावा

डोहाळजेवणाला वाटी उघडली की पेढाच पुढे दिसावा

मुलगी होता हळहळ होते हा कुठला हो न्याय?

स्त्री अर्भकाला मारायला हात धजावतात कसे काय?

कितीही लेकरे असली तरी जर मुलाशिवाय हलत नसेल पान, 

तर मुलीचा जन्म शाप की वरदान?

मुलगी झाली असता खर्च दिसतो तिच्या शिक्षणाचा

पण मुलाला कधीच विचारलं जात नाही “हा खर्च कशाचा?”

इथुनच सुरू होतो प्रवास पुढे तिच्या त्यागाचा

जिथे तिथे स्वत:च्या मनाला मुरड घालून घेण्याचा

तरीही कुणाला जर दिसत नसेल तिच्यातल्या गुणांची खाण, 

तर मुलीचा जन्म शाप की वरदान?

निसर्गानेच दिली तिला ताकद सहनशीलतेची

देवाने सोपविली जबाबदारी तिच्यावर बाळाला जन्म देण्याची

मुलीने आई होताना एका स्त्री भ्रूणाला घ्यावे समजून

आणि “मुलगीच हवी मला” असे म्हणावे आपणहून

अशी प्रत्येक आई जर देऊ शकली आपल्या बाळीला अभयदान, 

तर मुलीचा जन्म शाप की वरदान?

 

जन्माला आलेल्या लेकीला मुलासारखेच वाढवावे

घडवत घडवत तिला धनाच्या पेटीप्रमाणे जपावे

अशी ही लेक आईवडीलांसाठी नेहमीच झटते

एका मुलासारखंच काहितरी चांगल करून दाखवते

मुलगी असूनही सगळं करून जर ती वाढवत असेल घरच्यांचा मान, 

तर मुलीचा जन्म शाप की वरदान?

 

अशी ही मुलगी सारं काही सांभाळू शकते

कोणत्याही क्षेत्रात वर येऊन स्वतःच्या घरालाही घडवते

एका स्त्री कर्तव्यात ती कधीच कमी पडत नाही

आणि ही तारेवरची कसरत करूनही तिचा तोल कधीच जात नाही

ही “मुलगी” एका मुलापुढे जर पदोपदी ठरत असेल महान, 

तर मुलीचा जन्म एक वरदान वरदान आणि वरदानच !!!

- अभि.


Rate this content
Log in