STORYMIRROR

Ashwini Bhide

Others

2  

Ashwini Bhide

Others

मोती

मोती

1 min
3.0K


तुझ्या मिठीत विरघळते अन् तुझ्या ओठात भिजते

शिंपल्यातिल मोती असून मी रुप्यात जाऊन सजते

कोंदणात चांदीच्या जरी मी लखलखते

रंग पांढरा तुझाच लेवून मनी तुला मी जपते 

तुझ्याच मिठीत कायम रहावे जरी मला हे वाटे

तरी जगाने दिले कोंदणी जडवुन मजला काटे 

चांदी सोबत माझी किंमत आता जरी वाढली 

तरी कवडीमोल शिंपल्याची माया अंतरी साठली

त्याचेच प्रेम उजळवते तेजस्वी बनवते मला 

चांदीच्या कोंदणी उमटे अंगी एक एक ओरखडा

कीमती चांदीच्या कोंदणाची सोबत आता नको

निखळुन तिथून पुन्हा शिंपल्याच्या हृदयी मी साठो

©  अभि 


Rate this content
Log in