STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Fantasy

3  

Rajendrakumar Shelke

Fantasy

भावना

भावना

1 min
161

भावनाच नाही उरली

मनाच्या वेदनेला,

अव्यक्त व्यक्त या शब्दांनी

सांगतो लेखणीला.


शब्दांनीच साधला डाव

बाजार भावनांचा,

क्षणोक्षणी खेळ मांडला

माझ्याच आयुष्याचा.


मर्म ना कळाले मजला

जाणिवांच्या फुलांचे,

वेदनेच्या पाकळ्यांनाही

अश्रूच वाटे मोलाचे.


मन पटलावर

येते सय आठवणींची,

आसवेच सांगती

पुन्हा एकदा लढण्याची.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy