STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Others

3  

Rajendrakumar Shelke

Others

मराठी सन्मान

मराठी सन्मान

1 min
188

आजही आठवण येते 

मज त्य दिवसाची,

सारेच बोलत होते 

भाषा आंतर मनाची.


आनंद ओसंडून वाहे 

संवाद साधता मनाशी,

मन मोकळे होई 

बोलता मी तुझ्याशी .


आता काळ बदलला

बदलू गेले सारे,

जिकडे तिकडे फक्त 

इंग्रजीचेच वारे.


मराठीतील आईला 

इंग्लिशमध्ये ममी केली,

प्रत्येकाची वाणी 

आज मोर्डेन झाली. 


त्या दिवशी फक्त 

सारेच गोडवे गातात,

साहित्यातील किस्से 

आठवून सांगतात.


कधीतरी मनापासून

आईला आई म्हणा,

मातृभाषेला स्मरूनी 

टिकवा तिचा कणा.

  

काळजातून जपताना 

भाषा होईल महान,,

तेव्हाच दर्जा मिळेल 

मातृभाषेला समान.    


साहित्याला गुण द्या
लॉग इन