STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Inspirational

3  

Rajendrakumar Shelke

Inspirational

आई

आई

1 min
12

आई प्रेमाचा सागर

आई वात्सल्य *मूर्ती,*

आई दुधाची साय

आई कष्टाची *पूर्ती*

आई जीवनाचा सार

आई निर्मळ *मन,*

आई वेदनेची सल

आई जगी तू *महान*

आई तूच कृपावंत

आई माझे *संस्कार,*

आई सागराचे मोल

आई प्रेमाचा *पाझर*

आई माझ्या काळजाची

आई विस्ताराच *नाव,*

आई रात्रंदिन राबते

आई काळजाचा *ठाव.*

आई आई म्हणताना

आई तूच सांग *मना,*

आई तू नसताना कशी

आई मज बोचत *वेदना.*

आई कर्तव्याची शिदोरी

आई संस्कृतीचा *झरा,*

आई जगी तू महान

आई तुला वंदितो *अंतरा...!*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational