STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Others

3  

Rajendrakumar Shelke

Others

मराठी सन्मान ..!

मराठी सन्मान ..!

1 min
165

आजही आठवण येते 

मज त्या दिवसाची,

सारेच बोलत होते 

भाषा आंतर मनाची.


आनंद ओसंडून वाहे 

संवाद साधता मनाशी,

मन मोकळे होई 

बोलता मी तुझ्याशी .


आता काळ बदलला

बदलू गेले सारे,

जिकडे तिकडे फक्त 

इंग्रजीचेच वारे.


मराठीतील आईला 

इंग्लिशमध्ये ममी केली,

प्रत्येकाची वाणी 

आज मोर्डेन झाली. 


त्या दिवशी फक्त 

सारेच गोडवे गातात,

साहित्यातील किस्से 

आठवून सांगतात.


कधीतरी मनापासून

आईला आई म्हणा,

मातृभाषेला स्मरूनी 

टिकवा तिचा कणा.

  

काळजातून जपताना 

भाषा होईल महान,

तेंव्हाच दर्जा मिळेल 

मातृभाषेला समान.                                                                                 


Rate this content
Log in