आभास
आभास
तळ्याकाठी बसलो होतो
शांत पाणी न्याहाळत होतो
पाण्यात काहीतरी दिसत होतं
बहुधा तिचं ते रूप होतं...
मृगनई डोळे दिसत होते
गुलाबी ओठ दिसत होते
गालावरची खळी पण दिसत होती
ती गालावरची बट मला भुरळ घालत होती
ती माझ्या स्वप्नातील परी असावी
माझ्या मनाला साद घालत असावी
पण कदाचित तो एक भास असेल
म्हणून माझे मन आकर्षित होत नसेल...