STORYMIRROR

Sourabh Powar SP

Others

4  

Sourabh Powar SP

Others

माणूस मला व्हायचंय...!

माणूस मला व्हायचंय...!

1 min
588


जातीचा नाद सोडून

धर्माचा माज सोडून

माणुसकीचा हात धरुन

माणूस मला व्हायचंय...!


खोट्याची साथ सोडून

अविवेकाला लाथ मारून

सत्याची साथ धरुन

माणूस मला व्हायचंय...!


अमानुष वृत्तीला डावलून

बलात्कारी भावनेला झुगारून

विवेकाचा हात धरुन

माणूस मला व्हायचंय...!


हत्यारांना दूर टाकून

गुन्हेगारीला दूर लोटून

लेखणीला हत्यार बनवून

माणूस मला व्हायचंय...!


हिंसेला नष्ट करून

दंगलीला फस्त करून

अहिंसेला सोबत घेऊन

माणूस मला व्हायचंय...!


भोंदूगिरीचा पर्दाफाश करून

अंधश्रध्देचा नायनाट करून

विज्ञानाची कास धरुन

माणूस मला व्हायचंय...!


मनुवादाचं कंबरडं मोडून

भेदभावाचा अंत करुन

संविधानाची सोबत करुन

माणूस मला व्हायचंय...!



Rate this content
Log in