STORYMIRROR

Sourabh Powar SP

Tragedy

2  

Sourabh Powar SP

Tragedy

निर्दयी सरकार

निर्दयी सरकार

1 min
13.6K


जनता हातला लई कंटाळल

म्हणून यांनी कमळाला फुलवल 

पण याने तर नुसताच 

आश्वासनांच गाजर दाखवलं

खात्यात 15 लाख टाकणार हुतं

पण ते तर साफ निघालं खोटं

शेतकऱ्याला लई दाखवली आशा 

पण त्याला सुद्धा गुंडाळावा लागला गाशा

लाभार्थ्यांची जाहीर केली यादी 

पण त्यातही कारभार अनागोंदी 

शिक्षणासाठी करतो म्हणले तरतुदी

पण त्यालाही बनवले विनोदी

इथे होणार होता पारदर्शक कारभार 

पण भरला नुसता घोटाळ्यांचाच दरबार 

मोदी, मल्या करून जातो घोटाळा 

अन् यांचा सामान्यांच्या खिशावर डोळा

यांनी तर घोटाळ्यांवर घोटाळे केले

घोटाळ्यासाठी उंदीर पण नाही सोडले

विचारवंतांचे विचार नाही पटले

म्हणून यांनी त्यांचे मुडदे पाडले

मुडदे पाडून विचार संपेना म्हणून 

यांनी पुतळ्यांवरही साधला निशाणा

घटनेला, लोकशाहीला मारून लाथ

यांनी हुकुमशाही, जातीयवाद्यांना दिली साथ

मतासाठी काहिही करू म्हणले

त्यासाठी यांनी केली जातीय दंगले

सत्ता हाती आहे म्हणून असेल यांना माज

पण अशा कारभारामुळे जनता झाली नाराज

असे हे निर्दयी, कुचकामी सरकार

कधी होणार या देशातून हद्दपार.?




Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy