Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sourabh Powar SP

Romance Tragedy

2  

Sourabh Powar SP

Romance Tragedy

पहिलं अधूरं प्रेम

पहिलं अधूरं प्रेम

2 mins
455


जेव्हा माझ मन तिच्या प्रेमात पडल

तेव्हाच फेसबुकच अकाउंट काढलं


पण पुढं लयीच विचित्र घडलं

पासवर्ड काय ठेवायचा हे मोठं कोडं पडलं

आणि शेवटी

तिच्या माझ्या जन्मतारखेच सांगड घातल

आणि तेच माझ्या फेसबुकच पासवर्ड ठरल


मी फेसबुकवर नवखा होतो

त्यामुळं मला जास्ती कळत नव्हतं

रिक्वेस्ट तर तिला पाठवायची होती

पण मला ते जमत नव्हतं


काॅलेजमधल्या पहिल्या वहिल्या मित्राला

तिच्याबद्दल सांगितलं

आणि मला न विचारताच त्यानं तिला

माझ्यावतीन फ्रेंड रिक्वेस्ट सेंडल


आज अ‍ॅक्सेप्ट करेल

उद्या अ‍ॅक्सेप्ट करेल म्हणता म्हणता

ती काय रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्टना

अन माझ्या मनाला काही चैन पडना

शेवटी मीच माझ्या मनाला समजवलं


माझ्याकडेही मोबाईल नाहीय

तिच्याकडही नसल म्हणलं, कारण

एय वेड्या आपली बारावी है म्हणलं


दिवस सरत राहिल

HSC च टाईम टेबल आलं

12 वी ची exam झाली

परत तिची आठवण आली

फेसबुकवर पण नोटिफिकेशन आली

तिनं माझी रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्टलेली


( 12 वी ची exam झाली आणि CET/JEE चे क्लास सुरू झाले)

तिचा "Hi" मेसेज आला की

माझ्या काळजात चर्र व्हायच

अन मी "Hello" म्हणेपर्यंत

माझ्या सिमकार्ड च रेंजच गायब व्हायच

अन रेंज जरी आली तरी

मेसेज पाठवायच माझ धाडस नाही व्हयचं


नंतर मोबाइलला रेंजही येउ लागली

माझ धाडसही वाढू लागलं

आणि तिचं न माझ बोलण

नित्यनेमाने सुरु झालं

वर्गात तर बघायची

फेसबुकवर पण मेसेज करायची

पण मला हो म्हणेल की नाही

याची मात्र काळजी वाटायची


कारण मी तीला बघायचो

ती ही मला बघायची

हे अस सगळ चालुच असायच

पण तिच्या त्या नजरेचा अर्थ

मला कळतच नसायच

माझ्या मनात मात्र

गैरसमजांच काहूर उठायच


फेसबुकवर माझं बोलण वाढत गेलं

तिच मात्र रिप्लाय येणं कमी झालं

का कोणास ठाउक माझ्या मनात मात्र

भितीचं वादळ उठाय लागलं

पण तरीही मनाचा निश्चय करुन

तिला I Love you च मेसेज सेंडल


तिकडून मात्र मला कायमचच ब्लाॅक केल गेल

परत मी माझ्या मनाला समजावलं

शेवटी फेसबुक हे आभासी जग है म्हणलं

समोरासमोर माणसांच्या भावना समजतात


फेसबुकवर त्या भावनांना किंमती नसतात

शेवटी खरं प्रेम हे खऱ्या आयुष्यात होतं

फेसबुकवर त्या प्रेमाचा बट्ट्याबोळ होतो


आज तिला परत रिक्वेस्ट पाठवण्याचा

अंतर्मनाने प्रयत्न करतोय

पण आता फेसबुकला पण कळलय

ते ही म्हणाय लागलय

You can add people only

You may know personally


पण माझ्या जिवाची होत्या कायली

हे त्या झुक्यान अजून नाही पाहिली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance