STORYMIRROR

Sourabh Powar SP

Inspirational Others

2  

Sourabh Powar SP

Inspirational Others

पडदा

पडदा

1 min
14.1K


असले मुक्त मी

बाहेरुन जरी

बंदिस्त आहे 

या पडद्याआड

असले मला 

स्वातंत्र्य कितीही

जाउ नाही शकत 

या पडद्या पल्याड 

समाजव्यवस्थेने 

इथल्या मला 

दिला असला जरी 

वरवरचा मान 

इथल्या कामूक 

वासनेच्या विकृतीमुळे

क्षणोक्षणी होतोय 

माझा अपमान 

पडदा असला जरी 

साध्या कापडाचा 

आत मात्र 

त्रास आहे जोखीमीचा

पडद्या मागचा 

त्रास आहे 

माझ्या वरच्या

अत्याचारांचा, 

अन्यायाचा, 

हिनपणाची वागणूक 

देणाऱ्या कर्मठ 

विचारांच्या मनुष्यांचा... 

झाले असले जरी 

इथले समाजप्रबोधन 

अजूनही बदलला 

नाही दृष्टिकोन 

म्हणून आता मीच 

प्रयत्न करतीये 

हा त्रासदायक 

पडदा फाडण्याचा 

नव्याने निश्चय 

करतीये मुक्तपणे 

संचारण्याचा.....! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational