STORYMIRROR

Sourabh Powar SP

Romance

3  

Sourabh Powar SP

Romance

अबोल प्रेम

अबोल प्रेम

1 min
824


अचानकपणे आपण

एकमेकांसमोर यावे

डोळ्यात डोळे घालून

नुसतेच पाहत बसावे


अनपेक्षितपणे घडलेल्या

या दुराव्यानंतरच्या भेटीत

तु ही अबोल रहावे

नि मी ही अबोल रहावे


पोटातल्या शब्दाला

ओठावर न येऊ द्यावे

डोळ्यातल्याच इशाऱ्यांनी

अबोलपणे बोलावे


अबोलपणाच्या भेटीत

इशाऱ्यांचा खेळ व्हावा

त्यात आपल्याच जीवनाचा

गुलाबी भुतकाळ आठवावा


अबोल, अव्यक्त प्रेम

अबोल्यानेच खुलत जावे

आपल्या प्रेमाचे बंध पुन्हा

अबोल्यानेच जुळून यावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance