बहीण..
बहीण..
बहीण...
उन्हातली छाया
चंदनासम झिजवी काया..
बहीण...
संकटी सुखाची पाऊलवाट
त्याग-समर्पणाची सागरलाट..
बहीण..
निर्व्याज प्रेमाचा सुर
कोजागिरीचं चांदण टिपूर..
बहीण..
गोड गाणं मंजुळ स्वरातलं
सौख्य भिंत घरा-दारातलं..
बहीण..
जणू दुधाची साय
आईनंतरची दुसरी माय..
बहीण..
रानुबाई- मुक्ताबाई
घराची विठू-रुखमाई..
