STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

वंदन शिवबांना..

वंदन शिवबांना..

1 min
195

जय भवानी जय शिवराय

अशी करून गर्जना,

आज शिवजयंती दिनी

मी करतो वंदन शिवबांना...


थोर शूर वीर शिवबा सम

राजा ना झाला ना होणार,

आम्ही मावळे शिवबाचे शूर वीर

नाही मरणाला भिणार,

अन्यायाची चीड आम्हा फार

देऊ न्याय सकल जना...


शपथ शिवबाची आम्ही घेऊ

दीनदलितांना न्याय देऊ,

जनकल्याणासाठी सदा

शिवबा सम धाव घेऊ

शिकवण शिवबाची स्वराज्याची

शूर वीर शिवबाचा बाणा...


गाऊ शिवबाचे गीत, पोवाडे

स्फुर्ती देती किल्ले, गड, राजवाडे

तलवार भवानी शिवबाची

भगवे निशाण हे फडफडे

आठवा पराक्रम तो शिवबाचा

करू जय शिव गर्जना...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational