STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational

4  

मैथिली कुलकर्णी

Inspirational

कुटुंब (अष्टाक्षरी)

कुटुंब (अष्टाक्षरी)

1 min
325

माप हे ओलांडून मी

झाले सासुरवाशीण....

स्वप्न संसाराचे मनी

झाले गृही पदार्पण ।।


एक नाही दोन नाही

घरी माणसे तेवीस...

कशी वावरू मी इथे?

जीव झाला कासावीस ।।


कोण घेई समजून?

माझ्या मनीच्या भावना....

नववधू बावरले

कोणा बोलू मी कळेना ।।


मोठ्या कुटूंबात माझ्या

तोटा नव्हता नात्यांना...

पण स्वभावाच्या मात्र

तऱ्हा साऱ्यांच्याच नाना ।।


प्रेम, ममता, जिव्हाळा

नाते सन्मानाचे इथे.....

कुटुंबात माझ्या सर्व

मला हेच जाणवते ।।


स्थिरावले घरात ज्या

सासू, सासरे, नणंद....

दीर, जाऊ सवे माझ्या

आता संसारात आनंद ।।


पती-पत्नी संसारात

कौटुंबिक हा गोडवा....

सुख-दुःख भोगताना

माथी आशीर्वाद हवा ।।


सुखी सासरी मी माझ्या

सख्खे-चुलत नसते....

परिवार आदर्श हा

समाधानी वावरते ।।


कष्ट थोरांनी सोसले

घर स्थिरावण्यासाठी.....

माझे आता दायित्व हे

तेच टिकवण्यासाठी ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational