धुळवड
धुळवड
इंद्रधनुपरी रंगांची उधळण
गगनी पाहा किती झाली,
भास्कर प्रकट होताच
धुळवडीस सुरुवात झाली
राग-द्वेष-मत्सर-असूयेची
दाहकता करू रंगासवे अर्पण,
जीवनातील सुख-दुःख विसरून
शमवू आयुष्याचे रण
नको उधळण सप्तरंगी
उधळू नात्यातील रंग,
सर्व रंगाहूनी रंगीन वाटे
माणुसकीच्या धर्माचा रंग
रंगाला माहीत नसते
जात-धर्म-वेश-भाषा,
उधळणाऱ्या रंगासोबत
असावी प्रेमाची नशा
रंगात स्वच्छंदी भिजूनी
उठावे मनी रंगतरंग,
संकल्प धुळवडीचा करूया
राहावी आपली एकात्मता अभंग
