करियर
करियर
आईच्या मते होतो मी समजूतदार आणि भोळा
कसाही असलो तरी होतो तिच्या पोटचा गोळा
मलाच माहित होतं वाईट मी होतो किती
अभ्यासाच्या नावाखाली उनाडक्या करायचो दिनराती
बघितला मित्राच्या हातात भरपूर पैसा
आपल्यालाही मिळावा वाटला ऐशोआराम ऐसा
लागलो अभ्यासाला विसरून गेलो सारं
आई खेड्यात, मी शहरात, होतं डोक्यात नोकरीचं वारं
आईचं म्हणणं होतं जिथं राहशील तिथं सुखात राहा
आठवण आलीच माझी तर चार दिवस गावाकडं येऊन पाहा
करियरच्या नादात गमावलं होतं मी माझं जग
नाही कळली मला माझ्या आईची माझ्यासाठीची तगमग
आता फक्त तिच्या म्हातारपणात तिची काठी व्हायचंय
नको करियर, नको पैसा, फक्त तिच्याजवळ, तिच्यासाठी राहायचंय!
