STORYMIRROR

Somesh Kulkarni

Tragedy Others

4  

Somesh Kulkarni

Tragedy Others

ओढ

ओढ

1 min
350

पावसाची चातकाला ओढ ऐशी लागते;

प्रेम आहे, प्यास नाही, हाय कैशी भागते?


ते पहा नक्षत्र आले स्वाती म्हणुनी थांबतो,

करुनी त्राटक या नभी तो तेवढे जल प्राशितो


प्राणसुद्धा अर्पितो तो जर कडाडे वीजही,

अटळ जर मृत्यूच आहे जर मिळे ना नीरही


हे असे आभाळ जाते गरजुनी पुन्हा पुन्हा;

काय केले, प्रेम केले, चातकाने हा गुन्हा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy