STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

4  

Kishor Zote

Inspirational

सामर्थ्य लेखणीचे

सामर्थ्य लेखणीचे

1 min
24K

महात्मा फुले यांनी 

आसूड तो ओढला 

प्रस्थापित व्यवस्थेचा 

बुरखाच फाडला


मुक्ता साळवेने

निबंध तो लिहिला 

मला धर्मच नाही 

खडा सवाल मांडला


डॉ. बाबासाहेबांनी 

लिहिले संविधानाला 

जगात सर्वश्रेष्ठ ते 

ठरविले भारताला


सामर्थ्य लेखणीचे

जाणिले ज्यांनी 

जगातील क्रांती 

घडविली त्यांनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational