STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

4  

Chandan Pawar

Inspirational

माझा शिवबा

माझा शिवबा

1 min
23.8K

नियतीला नमवणारा 

गनिमांना झुकवणारा,

काळावरही विजय मिळवणारा 

असा माझा शिवबा


प्रजेला जपणारा 

रणांगणी मुरुड लढणारा    

स्वराज्य स्थापनारा 

असा माझा शिवबा


समानतेचे बीज पेरणारा

आया-बहिणींना जपणारा,

अन्यायाविरुद्ध पेटणारा 

असा माझा शिवबा


वायू वेगाने धावणारा   

दुश्मनांची झोप उडवणारा,

संस्कृतीचे रक्षण करणारा   

असा माझा शिवबा


कायम तत्वनिष्ठ असलेला

मानवतेचे सूत्र जोपासणारा,

जाती-धर्मभेद न मानणारा 

असा माझा शिवबा


स्वतंत्र भगवा फडकणारा   

शिवराजमुद्रेचे पालन करणारा,

शिवशाहीने राज्य करणारा

असा माझा शिवबा


इतिहास समृद्ध करणारा

प्रत्येकाच्या हृदयी राहणारा,

जीवनसंघर्षाची प्रेरणा देणारा 

असा माझा शिवबा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational