असा पडला पाऊस
असा पडला पाऊस
असा पडला पाऊस
चिंब झाले झाडे वेली,
पक्षी गेले घरट्यात
फुले न्हाऊन गेली...१
ओला रस्ता काळा कुट्ट
स्वच्छ निर्मळ चकाके,
उजळले निसर्गाचे
रूप सुंदर झळाळे...२
ओढे वहावते जसे
नद्या तुडुंब भरल्या,
लोंढा पाण्याचा पाहून
नाले वहावून गेल्या...३
सुगंधित परिसर
काळी माती तृप्त झाली,
पेरणीस बळीराजा
सज्ज तयारीस लागी...४
उगवली हिरवळ
चोहीकडे हळूवार,
पावसाच्या ओलाव्याने
फुले मनात मोहोर...५
