जीवनातील रंग
जीवनातील रंग
रंगात रंग घालुनी
होऊ स्वैर स्वच्छंद
तोडूनी सगळे बंध
जीवनात उधळूया आनंद ||
जीवनात आहेत अनेक
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग सुखाचा, रंग दुःखाचा
रंग वाढवू नव्या उत्साहाचा ||
रंगात रंगले जीवन
आनंदाने फुलले मन
हृदयी उरले आहे प्रेम
करु या नव्या नात्याची गुंफण ||
मी आहे रंगाची पिचकारी
भरुनी रंग सारे त्यात
जीवनात सतत खेळी
इंद्रधनुष्याचे रंग सात ||
लिहीत गेले जीवनाचे रंग
भाव माझ्या डोळ्याचे
शब्द गेले जुळवीत
रंग फुलले कवितेत ||
