माणुसकी
माणुसकी
आहे जे कपट आपल्या मनात
नाही भेटल माणूसकी जगात
पहा मदत करुनि लोकांची
मिळेल मना आनंद
माणूसकी ठेवण्याचा बनवूया
आपुला छंद
धन मोजू नका कधी मापाने
की कोणाजवळ आहे कीती
का बनवत नाही रे आपल्या
माणूसकीची रीती
पहा एकादा दूर करूनी
दुसर्याची दुख
त्याने मिळेल तुमच्या मनाला रे सुख
माणसाच्या माणूसकीत देव मिळेल
कधी पर्य्ंत मंंदिरात पहात फिरेल
जगाला कधि हे कळेल
यानेच आपुला रस्ता वळेल
