साहित्याची शब्द अनमोल शिदोरी
साहित्याची शब्द अनमोल शिदोरी
साहित्यांच्या शब्दांचा
नसे कुठलाच मोल
कारण आहे साहित्य
ते अती शब्द अनमोल
घेता हाती लेखणी तेव्हा
शब्दांची वाजे तालावरी मृदुंग
उडे साहित्याची आनंदी
ती आकाशी पतंग
साहित्याची असे ती
आनंदी मय रीत
जुडवी मनात शब्दांची व
साहित्याची प्रीत
साहित्यिक घेई शीदोरी
लेखणीची हाती
होऊन दंग लिहिण्यात
विसरुनी सगळी जात पाती
जुळते त्या लेखणीशी
साहित्याचे हृदयी मेळ
राही सोबत लेखनी
जणू मैत्री खेळी खेळ
स्वीकारण्यास प्रत्येक
ती कुठलीही आव्हाहन
दिले नेहमीच साहित्यिकाला
लेखनीने प्रोत्साहन
साहित्याची अनमोल शिदोरी
नसे कधीच ती स्तंभ
तरी कधी केव्हाही
लेखणी घेऊन प्रारंभ
