माझा भारत देश महान
माझा भारत देश महान
आपुल्या देशाचा
आहे एकच मंत्र
चाली इथे फ़क्त
मानवतेचाच यंत्र
नाही मोठ व लहान कोन
भारत देश आपला महान
हात जोडुनि करिते
याला हो सर्वेच प्रणाम
मानुसकी ही ईथे असो
एकात्मता अंतरी ती ठसो
सगळेच आपले हे मनी वसो
याने भारत देश सुंदर दिसो
लढण्यास घेई एकात्मता हाती
न पहाता कुठलीच जाती
होय ही आपलीच माती
जुळी इथे आपुलकीची नाती
सुंदर शब्दांचे इथले बोल
नाही समजू शकेल याचा मोल
भारत देश आपला आहे अनमोल
