जीवन
जीवन
माझे जीवन गाणे
कधी सुरात सूर कधी बेसूर
कधी तालावर कधी बेताल
असे हे जीवन सुमधुर
कधी निरागस कधी हताश
कधी सामंजस कधी खोडकर
असे हे जीवन जगणे
यास पैलू पाडती अनेक स्तर
जितके सुख तितके दुःख
कधी अनावर कधी शांत
सुखी जीवनाचा मंत्र एकच
विचार कर एकांतात
कधी हसावे कधी रूसावे
याचे उत्तर ना कुणाकडे
जगणे शिकवी हे जीवन
वाट दावती जगण्याकडे
कधी जमले कधी न जमले
खेद आता उरला नाही
अभिमान वाटे जीवनाचा
याच्या सारखे दुसरे काहीच नाही
