नात्यांची गुंफण
नात्यांची गुंफण
नाती म्हणजे कुटुंब
तिचे विविध स्वरूप,
जन्म, विवाह, दत्तक
नाते वाढवी हुरूप..!!१!!
थोर वडील प्रमुख
शिस्त लावी जीवनात,
आई ममता वाढवे
दिसे एकी कुटुंबात..!!२!!
अडचण येता जरी
उभे कुटुंब पाठिशी,
निवारण करण्यास
देई होकार मताशी..!!३!!
मन सर्वांचे सांभाळे
सण करून साजरे,
एक साथ उत्साहात
दिसे कुटुंब गोजरे..!!४!!
भावनिक, प्रामाणिक
दिसे आत्मविश्वासात,
मोठे, लहान कुटुंब
व्यक्ती घडे संस्कारात..!!५!!
