साथ
साथ
साथ तुझी हवी
माझ्या सोबतीला
ऊन असो की पाऊस
एकरूप हो माझ्या सावलीला
साथ तुझी हवी
सुख दुःखाच्या क्षणांना
दे नव्याने उभारी
आयुष्य जगताना
साथ तुझी हवी
अबोल मनाला
बोलके होतील शब्द
आधार दे मजला
साथ तुझी हवी
प्रेमाच्या वाटेवर चालताना
साथ देशील का
आयुष्यभराची सोबत निभावताना
साथ तुझी हवी
माझ्यातला मी शोधताना
सदैव रहा सोबत
खडतर प्रवास करताना
