यश
यश
यश हे आपल्या सोबतच असते
आपण त्याला जाणायचे असते
केव्हा कधी घडेल हे बघायचे असते
यश हे आपल्या पाठीशी असते ।।
विकासाच्या उंच शिखराकडे बघायचे असते
आपल्या मागोमाग ते येतच असते
कष्ट, मेहनत, प्रेरणा, याच्या स्रोताने,
विकासाचा दिवा लागत असते ।।
खंत कधी बाळगायची नसते
विकासाची किरणे उगवत असते
शांतता, संयम, आत्मविश्वास, चिकाटी
यातच यश हे लपलेले असते ।।