#ThankyouTeachers
#ThankyouTeachers


तुमच्या मुळेच मज ला,
जगी जन्म हे मिळाले..
माय-बाप लेकराचे,
असती गुरू च पहिले..!!
संस्कार आई देते,
देतात बाबा धैर्य..
देता गुरूजी ज्ञान,
मी गाजवीन शौर्य..!!
गुरुजी तुम्हीच दिला,
मज धीर उडण्याचा..
पंखातल्या बळाने,
आकाश गाठण्याचा..!!
झालो तुझ्याच पायी,
तारा जणू नभाचा..
अंधार दूर झाला,
या भयाण वाटेचा..!!
सोडून होतो आशा,
आधार मिळण्याची..
तुम्हीच झाले काठी,
या डुबत्या नौके ची..!!
नात्यात नाही आपल्या,
धर्म,जातीचे बंधन..
मज धन्य, धन्य वाटे,
करुनी तुम्हास वंदन..!!