सेवा हाच धर्म
सेवा हाच धर्म
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
पक्षी बनून नभात जाईन
ढगाला त्या चोच मारीन.
तहानलेल्या सृष्टी ला मी,
पोटभरून पाणी पाजीन.!
देवा नशिबी दे.गा....देवा !
पाऊस बनून ढगातला
धरणी वरती पडेन.
दुभंगलेल्या धरतीला मी,
ओल्या मायेत बांधेन.!
देवा नशिबी दे.गा...देवा !
झाड होऊन अवनी वरचा
आसरा होईन सगळ्यांचा.
थकलेल्या जीवाला मी,
आधार देईन सावलीचा.!
देवा नशिबी दे.गा..देवा !
नदी होऊन डोंगरावरची
राहीन सतत वाहत.
तहानलेल्या जीवांसाठी,
दाही दिशा धावत.!
देवा नशिबी दे.गा...देवा!
जन्म घालसील देवा मला
कुठं ही असू दे.
सेवा करीन सर्वांची च मी,
नशिबी राहू दे.!
देवा नशिबी दे.गा...देवा!