STORYMIRROR

Khemraj Pandhare

Tragedy Others

3  

Khemraj Pandhare

Tragedy Others

पावसाची ओढ

पावसाची ओढ

1 min
48

पाही आकाशातल्या शुभ्र वर्णी मेंढरांकडे,

शेतकरी आतुरतेने बघतो आहे मेघांकडे


टाकली आहे शेतात पसरून पुंजी त्याने,

गहाण पडून आहे दागिना सावकाराकडे

शेतकरी आतुरतेने बघतो आहे मेघांकडे


भुलवून जात आहेत, रिते यांचे घडे भरून,

ना उगवला पीक माळी, नाही पावसाडे

शेतकरी आतुरतेने बघतो आहे मेघांकडे


बघत आहेत पावसाविना पीक करपलेले,

शेतावरून जातो तरी वरुण नाही रडे

शेतकरी आतुरतेने बघतो आहे मेघांकडे


दाटले हे मेघ आता, वीजराणी नाचते,

पावसाची ओढ लागून तो आनंदाने रडे

शेतकरी आतुरतेने बघतो आहे मेघांकडे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy