चिंब पाऊसधारा
चिंब पाऊसधारा

1 min

42
उनाड वासरागत आनंदाने उड्या मारीत
अंगाचा मळ काढून,कपड्यावर चिखल मारीत
मनातील दुःख,निराशा,अपेक्षांचे ओझे टाकीत
चिंब भिजावे त्या कोसळत्या सरीत!!
त्या जगाचे नी स्वतःचे भान विसरीत
बेभान होऊन ना कुणाची पर्वा करीत
अजाण बालकासम, त्याचेच खेळ खेळीत
चिंब भिजावे त्या कोसळत्या सरीत!!
तहानलेला चातक मी पावसाची वाट बघीत,
थेंबथेंब पावसासाठी जीवाचे रान करीत
पाऊस आला म्हणून आनंदाने गिरकी मारीत,
चिंब भिजावे त्या कोसळत्या सरीत!!
पहिल्या वहिल्या पावसाने धरणी होई गंधीत,
रोपा ने ही त्याचे पाय जमिनीत रोवीत
वादळ,वारा पावसाचा,सामना मी करीत,
चिंब भिजावे त्या कोसळत्या सरीत!!