सूर्यास्त
सूर्यास्त
1 min
246
धनुर्धाऱ्याने बाण सोडला
आकाशी तव रक्त सांडला.
लाल तांबडा लहू उधळला
रवी गेला तव अस्ताला..!
रंगात रंगला,दिनकर भिजला
होळीचा मग खेळ खेळला.
लाल तांबडा रंग लागला,
रवी गेला तव अस्ताला..!
सुर्याचा मदीरेचा प्याला
संध्याने तो दूर फेकला,
लाल तांबडा मद्य उडाला
रवी गेला तव अस्ताला ..!
सूर्याजी तो आतुरलेला
नववधूच्या त्या प्रेमाला
लाल तांबडा ईश्क उडाला
रवी गेला तव अस्ताला..!
दृश्य मनोहर नयनी देखला
नयनांनी तो मनी कोरला,
हृदयी माझ्या हर्ष दाटला
रवी गेला तव अस्ताला...!