झलकारीबाई
झलकारीबाई
झाशीची राणी लक्ष्मीबाई
सैन्यदलातील सेनापती
नाव असे झलकारीबाई
लक्ष्मीबाईचे प्राण वाचवती...१
पूरण पती सैन्यात
इच्छा तीची केली पूर्ण
लक्ष्मीबाईचा आरसा
होता तसाच तिचाही वर्ण......२
शौर्य पराक्रमी अशी
इंग्रजांशी लढली
फितूर तो दिल्लेराव
पतीची विरगती पाहीली....३
दर्शन घेतले पतीचे
तुटून पुन्हा पडली
इंग्रजांची मुंडकी
धडाधड उडवली....४
ब्रिटीश छावणीत
बिनदिक्कत गेली
हिम्मत असेल तर दया फाशी
डरकाळी अशी फोडली.....५
जनरल ह्युग रोज
चक्रावून तो गेला
पाहुन त्या पराक्रमा
नतमस्तक तो झाला...६
