STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

4  

Kishor Zote

Inspirational

ताराबाई शिंदे

ताराबाई शिंदे

1 min
1.0K

स्त्री शोषणाविरुध्द लढा

वाघीण ती महाराष्ट्राची

बंडखोर अशी लेखिका

लेक ती बुलढाण्याची....१


सत्यशोधक संस्कार

जमीनदार वडील

कार्यकर्ते सत्यशोधक

लेक सत्याची बाजू लढील...२


मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत

उत्तम भाषा ज्ञान त्यांचे

घोडेस्वारी धाडसी निर्णय

नाही स्विकारले बंध पतीचे....३


स्त्री - पुरुष तुलना

निबंध तो लिहला

समाज तो चवताळला

राष्ट्रपिता जोतीराव पाठींबा दिला....४


विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण

स्त्री हिंसा व धर्म संस्कृती

भारतीय स्त्री पुरुष सत्तेवर

प्रश्न सारे चिकित्सकपणे सोडवती...५


स्त्री स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या

विरोध दुहेरी मापदंडाला

तीच महान शक्ती होती

त्रिवार नमन तिच्या कार्याला....६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational