STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational Others

विजयादशमी

विजयादशमी

1 min
324

परतीचा पडतो पाऊस

डोंगरमाथा धुण्याची त्याला हौस


मनापासुन त्याला घालायचे अभ्यंगस्नान अमृतधारांनी

पानाफुलांनी दरी ही जाते बहरुनी


कड्याकपारीतुन खळखळणारा वाहतौ हा झरा

दुरुन बघण्यासाठी नयनरम्य निसर्ग खरा


धरतीवर उतरतो स्वर्ग 

दुर्गेला दिसला हा सुंदर मार्ग


नवरात्रीच्या नऊ रात्री अष्टलक्ष्मीचा वास

श्वासाची अखंड अगरबत्ती खास


मनाच्या गाभार्‍यात देवीचे स्थान भव्य

तेवणार्‍या नेत्रज्योतींचा दिवा, प्रकाश दिव्य


मानाचा नेवैद्य कंदी पेढे

प्रत्यक्ष दर्शनाची आस 

मागणी करते हे मन वेडे


तुझ्या महान शक्तीने केले तु दैत्यांना ठार

विजयाचा होम केला, आनंदिली तु फार


होमामध्ये चंदन लाकूड, वाहिले गायीचे तुप, श्रीफळ

जीवन संघर्ष करण्याला ,आई तु देते स्त्रियांना बळ


संकट निवारण्याची आळवितो आरती

अष्टलक्ष्मी तु विष्णुची

त्रिवार वंदन तुला, तु खरी स्त्री शक्ती


चरणकमळी नमवितो शीर, मानाचा मुजरा 

घराघरात साजरा होतो विजयाचा दसरा


दसर्‍याला श्रीखंड पुरी

विनवणी तुला वाईटाच्या नाशासाठी

तु रहा कायम भुमिवरी ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational