STORYMIRROR

Dhanesh Jukar

Inspirational

4  

Dhanesh Jukar

Inspirational

म्हातारा

म्हातारा

1 min
419

म्हातारे!! तुझ्यावर प्रेम होतं

म्हणूनच लवकर मेलो

तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन

शांत झोपून गेलो


तुला पटणार नाही पण

तुझ्यावर प्रेम आहे अजून

तुझ्या अवतीभवती मी

राहिलोय थोडा टिकून


नाही पटत ??

माझी कवळी आहे

तुझ्या कवळीच्या डब्यात अजून

नीट बघ पायात

माझ्याच स्लिपर्स घातल्यास चुकून


तुझ्या चष्म्याची एक काडी

माझ्या चष्म्याची आहे

कोपऱ्यात उभी माझी काठी

तुझ्या मुठीचा आधार आहे


थकलेल्या डोळ्यांनी नीट

दिसत नाही न तुला

हृदय उघडून बघ म्हातारे

मी आहे अजून सोबतीला


तू म्हणायचीस,

माझे डोळे खोटं बोलत नाहीत

म्हणून तेच मी देऊन टाकले

तुला निरंतर पाहण्यासाठी


रस्त्याने चालताना सांभाळ म्हातारे

एखादे डोळे तुला निरखून बघतील

ती नजर खोल पोहोचेल, तू लाजशील

धीर एकवटून पुन्हा तू नजर भिडवशील


तेव्हा खात्री बाळग म्हातारे

ते डोळे माझे असतील

खरंच म्हातारे बघ नीट बघ

माझे डोळे खोटं बोलत नाहीत 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational