आदर्श परिवार
आदर्श परिवार
आजकालच्या जगात फारच
कमी दिसतात आदर्श परिवार |
सुख शांती समृद्धी संगे प्रेम जेथे
नांदे परस्परांची ओढ अनिवार | |१| |
आई वडिल,काका काकू आजी
आजोबा सवे लाडकी आत्याबाई |
मामा मामी भाऊ बहिण भाचा नि
भाची संगे प्रेमळ मावशीबाई | |२| |
एकमेकांना समजून घेती सारे
येणा-या अडिअडचणीच्या वेळी |
भांडण तंटा राग रूसवा विसरून
क्षणात प्रेम नादे जेथे वेळोवेळी | |३| |
प्रेम आदर लळा जिव्हाळा कर्तव्य
नुसते नकोत शब्द बघायला फक्त |
मानसन्मान ठेवून सर्वांचा जिथे
नसणार कायदे वा नियम ते सक्त | | ४| |