STORYMIRROR

Ravindra Ranalkar

Abstract

3  

Ravindra Ranalkar

Abstract

कन्या

कन्या

1 min
225

असावी प्रत्येक घरात

कन्या लोभस प्रेमळ |

जिच्यामुळे घर हसेल

आनंदच नांदेल केवळ | |१| |


लाडकी पोटची कन्या का?

द्यावी लागे दुसऱ्यास दान |

काळजाचा तुकडा आपला,

वाढवण्यास दुसऱ्याची शान | |२| |


कन्या तुळशीवृंदावनाची पणती 

देणे कठीण जरी परक्याचे धन |

ठरवूनच मनाशी तिला पाहुणी

राहावे लागते गप्प मारीत मन | |३| |


संस्कार, शिक्षण देऊन तिला

लग्नकार्य पाडत राहतात पार |

सासरी तिला पाठवल्या नंतरच

बंद का होत जाई माहेरचे दार | |४| |


एकदा आपण केलेलं दान जसं

म्हणे मागता येत नसते ना परत |

तद्वत कन्यादानाने माहेरालाच ती

पारखी गृहित मनी नाही ना धरत | |५| |


जरी ती असते आपली सोनपरी 

तरी तिला क्षणात विसरावे लागे |

रक्ताने घट्ट विणलेले मायेचे पाश 

सुटतील तरी कसे रेशमांचे धागे | |६| |


तुळशीला ही दुसरीकडे रुजण्यास

द्यावाच लागतो ना काहीतरी वेळ |

हाडामासाची लेक सासरी देतांना

माहेरच्यांनी कसा साधावा मेळ? | |७| |


नसे तो त्यांच्यासाठी भातुकलीचा

बालपणीचा मांडलेला डाव काही‌ |

सासरी जाणारी लेक मायबापांना

लपवतांना अश्रूंचे कढ हळूच पाही | |८| |


देण्यास जगात इतके अवघड दान 

दुसरे काही असणेच शक्य नाही |

लेकीनं भरलेलं घर रिकामं करून

दुसऱ्यांचे घर भरुन देणं सोपं नाही | |९| |रं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract