गरजेपुरती मैत्री
गरजेपुरती मैत्री
स्वार्थी या जगात दिसतो आहे
नवा गरजेपुरती मैत्रीचा फंडा |
गरज सरो वैद्य मरो अशा विचार
करणाऱ्यांचा त्यात हातखंडा | |१| |
मैत्री या शब्दाचा अर्थच यांना
नसतो समजलेला पुर्णपणे |
खरे तर असतात अपात्र लोचट
वागतात ही अती धूर्तपणे | |२ | |
मित्राच्या भावनेची कदर नसते
मुळीच यांना वाटत कधीच |
स्वार्थ साधण्यासाठी असे मैत्रीची
चढवली झूल ती मना मधीच | |३| |
पूर्ण होताच स्वार्थ हे मैत्रीला
ठोकतात अखेरचा रामराम |
गरजेपुरती मैत्री करणारांना मी
आधीच ठोकलाय रामराम | |४ | |
